भारत

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 April :- मनी लॉड्रींगप्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने नुकताच हा निर्णय सुनावला आहे. मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीकडून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणात गेल्या महिनाभरापासून ते कोठडीत आहेत. मात्र, आजही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पार्करसंबंधित मालमत्तांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहेत. यावरून त्यांचे नाव दाऊद इब्राहिमशीदेखील विरोधकांनी जोडले आहे. याप्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. सुरूवातीला ईडी कोठडीनंतर ते आता ऑर्थर रोड येथील न्यायालयीन कोठडीत आहेत.

आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना ईडीने विशेष न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान याप्रकरणी अधिक चौकशीसाठी नवाब मलिक यांची पुन्हा कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. त्याला मंजूर करत ईडीच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना आता 22 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आज पुन्हा सुनावणीनंतर त्यांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.