महाराष्ट्र

खळबळजनक वक्तव्य! सदावर्ते यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 April :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्याप्रकरणी आज बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील महिला व कामगारांनी मोर्चा काढला. यावेळी काळे झेंडे दाखवत या सिल्व्हर ओकवरील हल्ल्याचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे आणि हातात बांगल्या भरणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस बक्षीस देण्याचं धक्कादायक विधान केलं.

गुणरत्न सदावर्ते हे प्रत्येक कामगास संघटनेमध्ये हस्तक्षेप करून कामगारांना भडकवण्याचे काम करतात. शरद पवारांच्या बारामतीत 12 तारखेला येऊन बारा वाजता मोर्चा काढून हल्ला करीन असे म्हणतात. पवारांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत असून भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल टाकले तर त्यांची जीभ हासडणाऱ्यास रोख स्वरूपात अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल, असे तुकाराम चौधरी यांनी म्हटलं.

महिलांच्या रोजीरोटीचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर त्याच्या हातामध्ये जी महिला भगिनी बांगड्या घालेल तर त्या भगिनीस पाच लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजार रुपयाचे बक्षीस देखील बारामतीत जाहीर करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.