बीड

करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 April :- बीडमधून थेट धनंजय मुंडे यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना कोल्हापूरमध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला आहे. करुणा शर्मा यांचं डिपॉझिट देखील या निवडणुकीत जप्त झालं असून त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा अवघा शंभरीपार पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर खुद्द करुणा शर्मा यांनी मात्र माध्यमांशी बोलताना बीडमध्ये विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कोल्हापुरातील आगामी नगरपालिका निवडणुका लढवण्याचं बळ आपल्याला मिळाल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना मात्र मतदारांनी फारसं मतदान केलेलं नाही. करुणा मुंडे यांना या निवडणुकीत अवघी १३३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचं डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. झी २४ तासशी बोलताना करुणा शर्मा यांनी आयोगाकडे तक्रार केल्याचं सांगितलं आहे.