बीड

भाजपा आमदार गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 April :- नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. २०२१ मध्ये गणेश नाईक यांनी आपल्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप या महिलेने गणेश नाईक यांच्यावर केलेला आहे.

मी गणेश नाईक यांच्यासोबत २७ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि आम्हाला एक मुलगा देखील झालेला आहे, या मुलास त्याच्या वडिलांचं नाव दिलं जावं अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती. मात्र गणेश नाईक यांनी मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप संबंधित महिलेने केलेला आहे. आता याच प्रकरणात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय या महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे. तर, या प्रकरणी गणेश नाईक यांनी स्वत:ची डीएनए चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

माजी मंत्री व ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेत. सन १९९३ पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देवून व जीवे मारण्याची धमकी देवून तिचे लैंगिक शोषण करीत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिली आहे.