इतर राज्यांत लोडशेडींग का नाही?; राज्य सरकारला फडणवीसांचा सवाल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 April :- ”इथले राज्यकर्ते नाकर्ते आहे, ते त्यांचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवित आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचे, कुचकामी धोरणाचे राज्यसरकारने महाराष्ट्रावर लादलेले ही लोडशेडींग आहे अशी संतप्त प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि राज्य सरकारच्या धोरणावर प्रहार केला. इतर राज्यांत, काही काँग्रेस शासित राज्यात लोडशेडींग नाही, महाराष्ट्रातच लोडशेडींग का? असा फडणवीसांनी राज्य सरकारला सवाल केला.
देशात ‘सुडो सेक्यलर पार्ट्या’ तयार झाल्या आहते. त्यांच्या लांगुलचालनामुळे सांप्रदाकता वाढतेय असे विधान करीत फडणवीस यांनी सांप्रदायिकता वाढत असल्याची ओरड करणाऱ्यांच्या टीकेला आज उत्तर दिले.’काल मी केलेले ट्विट्स् आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्याचे महत्वही सर्वांच्या लक्षात आले असे ट्विट करून पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, काल मी केलेले ट्विट्स आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्याचे महत्वही सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यावर मला अधिक बोलण्याची गरज वाटत नाही.
सलग 14 ट्विटनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले. त्यानंतर शरद पवार यांनीही सविस्तर स्पष्टीकरणही दिले. या सर्व घडामोडीनंतर माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावर फडणवीस उत्तरले ”मी वस्तूस्थिती मांडली आहे या देशात अलकीडे सुडो सेक्युलिरझम वाढत चालले आहे. देशात सातत्याने ओरड होत आहे की सांप्रदायिता वाढली पण मी प्रमाणाासहीत ट्विट करून या टीकेला उत्तर दिले आहे. देशात सांप्रदायिकता वाढण्याचे कारण म्हणजे अशा पक्षांनी लांगूलचालन केले हेच आहे