महाराष्ट्र

वेळ आल्यानंतर नक्कीच उत्तर देऊ; सुप्रिया सुळेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 April :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा ठाणे येथे भरवण्यात आली होती. या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी करत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे, दाखवायचे ‘सुळे’ वेगळे असा टोला लगावला. तसेच राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण सुळेंच्या घरी रेड का पडत नाही, असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरेंच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या घरी धाड पडलेली नसल्याचे सुळेंनी सांगितले. तसेच राज ठाकरेंच्या भाषणाकडे फक्त करमणूक म्हणून पाहावं, असे त्या म्हणाल्या. तसेच ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्यांच्या टीकेबद्दल काय बोलणार?,’ असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

एकतर अजित पवारांच्या घरी धाड पडलेली नाही. राज ठाकरेंना आम्ही वेळ आल्यानंतर नक्कीच उत्तर देऊ. ही काही उत्तर देण्याची वेळ नाही. सध्या राज्यासमोर आणि देशासमोर मोठे प्रश्न आहेत, असे सुप्रिया म्हणाल्या. तसेच राज ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर आरोप केले. त्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नव्हते. एखादी करमणूक असते किंवा एखादा सिनेमा असतो, त्यात थोडा मसाला असतो. राज ठाकरेंच्या भाषणाकडे फक्त करमणूक म्हणून पाहावं, असे त्या म्हणाल्या.