राज ठाकरेंच्या उत्तर सभेवर पवारांची प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
13 April :- भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन वाढले आहे, अशी अमेरिकेने टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर उत्तर का देत नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोंदीवर टीका केली आहे. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली असून, त्यात ते बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात काल झालेल्या मनसेच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पवार बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, राज ठाकरे यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची काहीच गरज नाही. असे पवार म्हणाले. उत्तरसभेत राज ठाकरे यांनी पवारांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर टीकास्त्र केले होते. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीत अमरावतीत भाषणात मी शिवरायांचा उल्लेख केला, सुमारे 25 मिनीटे मी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण केले, शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व जिजाबाईंनी घडवले मात्र, पुरंदरेंनी दादोजी कोंडदेवांचा उल्लेख केला, त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंच्या याच भूमिकेला मी विरोध करतो. राज ठाकरेंनी सविस्तर वाचन केले असते तर ते असे बोलले नसते. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील लोकांनी एकही जागा दिली नाही. असे शरद पवार म्हणाले.
पुढे पवार म्हणाले की, मी एकाच मंदिरात जातो, मात्र गवगवा करत नाही. प्रबोधनकारांनी देवधर्माचा बाजार मांडला आहे. राज्यात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न दिसतो आहे. राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. राज ठाकरे भाषणात भाजपवर एकही शब्द बोलत नाही. भाजपने राज ठाकरेंना कोणती जबाबदारी दिली? असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे.