महाराष्ट्र

सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 April :- सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी एसटी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज पोलिस कोठडी संपली. त्यानंतर त्यांना आज गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात नेले जात आहे. याचदरम्यान सातारा पोलिसही सदावर्तेंचा आर्थर रोड कारागृहातून ताबा घेण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील संशयित गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी होणार आहे. तत्पुर्वी ”सातारा पोलिसांनी ताबा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती, ती विनंती न्यायालयाने मान्य करून आर्थर रोड कारागृहातून सदावर्ते यांचा ताबा घ्यावा असेही आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सातारा पोलिसांना 17 एप्रिलपर्यंत ताबा घेता येणार असून तशी परवानगीही पोलिसांना न्यायालयाकडून देण्यात आली आहे.