गेवराईकर रस्त्यावर; उग्र स्वरुपाच्या आंदोलनाचा दिला इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 April :- सध्या संपूर्ण राज्यामध्ये महावितरणकडुन अपात्कालीन लोडशेडींग लागु करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरासह बीड जिल्ह्यातही आठ आठ तास विज गुल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असताना गरमीने लोक उकडुन निघत आहे यातच महावितरणकडून आपात्कालीन भारनियमन चालु करण्यात आल्याने गेवराईकर नागरिक महावितरण विरोधात रस्त्यावर उतरले होते.
सध्या रमजान व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आलेली असताना विज गुल होत असल्याने गेवराई तील नागरिकांनी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले.यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.प्रशानाच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी निवेदन स्विकारले तर विजेची लोडशेडींग बंद करून विजपुरवठा सुरळीत केला नाही तर यापूढे उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनस्थळी गेवराई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.