‘या’ राज्यांमध्ये यावर्षी कमी पावसाची शक्यता
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 April :- राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, यावर्षी राज्यात यावर्षी चांगला पाऊस राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे याही वर्षी बळीराजा सुखावणार आहे.
याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो कायम ठेवला आहे. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही, असे देखील स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, मध्यप्रदेश-उत्तरप्रदेश आणि पंजाब, हरियाणामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. तर गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल.
राजस्थान आणि गुजरातसह, ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये संपूर्ण हंगामात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केरळ आणि कर्नाटकातही जुलै-ऑगस्टमध्ये कमी पाऊस पाडण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार, देशभरातील पावसाळ्याचा पहिला भाग उत्तरार्धापेक्षा चांगला राहील. जूनमध्ये मान्सूनची चांगली सुरुवात अपेक्षित आहे.