21 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचा मान कोल्हापूरला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
9 April :- 19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटील यांनी जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब. पृथ्वीराज पाटील यांना 2021 चा किताब मिळाला आहे. गादी विभागात अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकटेचा पराभव केला होता. विशाल बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील असा अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकर यांचा पराभव केला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांकडून 64वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला. पृथ्वीराजने विशाल बनकरचा 5-4 असा पराभव केला विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात तुफानी कुस्ती झाली. मात्र, अखेर पृथ्वीराज पाटीलने मैदान मारत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आणि मानाची गदा जिंकली आहे.
यापूर्वीच पृथ्वीराज पाटीलने पुण्याच्या हर्षद कोकाटेचा पराभव करत गादी विभागातून अंतिम फेरीत विजय मिळवला होता. तर, विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखला 13-19 अशा गुण फरकाने हरवत माती विभागातून किताबी लढतीत एन्ट्री केली होती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी मानली जाते, मात्र गेली 21 वर्षे कोल्हापुरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला नव्हता. मात्र 19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटीलने ही प्रतीक्षा संपवत कोल्हापुरकरांना हा मान मिळवून दिला आहे.
कोल्हापुरच्या मातीत तयार झालेला पृथ्वीराज पाटील हा आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळला आहे. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे हे त्यांचे मुळ गाव आहे. कोल्हापुरच्या जालिंदर आबा मुंडेंच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला आहे. पुण्यात आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची तयारी अमर निंबाळकर आणि राम पवार सयांनी करून घेतली आहे. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.
याआधी कोल्हापुरला 2000 साली महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली होती. यावेळी हिंद केसरी विनोद चौगुले यांना महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला होता. आणि यानंतर आता पृथ्वीराज पाटील यांनी कोल्हापुरला मिळवून दिला आहे. याआधी पृथ्वीराज पाटील याने 2021मध्ये झालेल्या सिनिअर नॅशनल स्पर्धेत सुवर्ण, तर 2022 मध्ये कास्यपदक पटकावले होते. खेलो इंडिया 2020 ला सुवर्णपदक मिळवून त्याने त्याच्यातील कौशल्य दाखवले. यानंतर त्यांने 2019 ला महाराष्ट्र केसरीच्या मैदानात 92 किलो गटातही उतरला होता. त्यातही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तो थेट महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी मैदानात उतरला आणि कोल्हापूरच्या पैलवानाच्या अंगातील रग दाखवली.