महाराष्ट्र

मुख्यमंत्री ठाकरेंचा संजय पांडेंना थेट सवाल; गृहखातेही बॅकफुटवर!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 April :- शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्याची सुरक्षा करण्यात आणि एकुणच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरण हाताळण्यात पोलिसांना अपयश आल्याने मुख्यमंत्री उद्धव नाराज आहेत. माध्यमाला माहिती मिळाली पण पोलिसांना कशी मिळाली नाही? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना केला आहे.उद्धव ठाकरे यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांनीही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर आता संबंधित पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे गृहखातेही आता बॅकफुटवर आले आहे.

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी नुकतीच गृहविभागाची बैठक संपली. या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कालच्या घटनेची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही? असा थेट सवाल मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलन प्रकरण हाताळण्यात अपयश आले. माध्यमांना हल्ल्याची माहिती कळते पण सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इभ्रत काढीत सुरक्षेवरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनीही याबाबत तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्र्यांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

याच प्रकरणावर गृहविभागाची बैठकही झाली आहे त्यात ही नाराजी व्यक्त झाली आहे. त्यामुळे आता संबंधित पोलिसांवर प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याचा ठपकाही ठेवला जात असून आता या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.