महाराष्ट्र

पुन्हा गृहमंत्री बदलण्याची शक्यता; दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्याच्या भेटीला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 April :- संतप्त एसटी आंदोलकांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक करत मोठा गोंधळ घातला. त्यानंतर शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिल्व्हर ओकवर बोलावून घेत चर्चा केली आहे. त्यानंतर आता वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले आहेत. सिल्व्हर ओकवर झालेला हल्ला हा पोलिस यंत्रणेचे अपयश असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून येत आहेत.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्य सरकारची आणि पोलिसांची नाचक्की झाली. त्यानंतर गृहखाते संभाळणाऱ्या वळसे-पाटील यांचे अपयश असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारने बुळबुळीत भूमिका घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार यांनी तातडीने गृहमंत्री वळसे-पाटील यांना बोलावून घेतल्याने त्यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.