महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलिस कोठडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 April :- एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

”पोलिसांनी गैरवर्तन केले, एसीपी पांडूरंग शिंदे यांनी गैरवर्तन केले, चष्मा तोडला. त्यांच्यामुळे हाताला इजा झाली असे सदावर्तेंनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायधीश कैलास सावंत हे सदावर्ते यांना जखमा झाल्या आहेत का? याची पाहणी केली पण त्यांना ”आपला हात दुखावला आहे, चष्मा तुटलेला आहे. मला उच्च रक्तदाब आहे अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना औषधी देण्याची परवानगी दिली.


दरम्यान सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या आजूबाजूला असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालय परिसरातून जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अनिल परब म्हणाले की, कामगारांना मार्गदर्शन करीत असून एसटी सुरु करण्याबाबत पाऊले उचलण्याबाबत मी चर्चा करून आलो. कायदा हातात घेतल्यानंतर काय होते हे आंदोलकांना दिसलेच आहे. कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही. सदावर्तेंना अपयश आले आहे. त्यांनी कुठलाही मुद्दा मान्य केला नाही. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी हल्ल्याचा सदावर्ते यांनी कट रचला असा आरोपही अनिल परब यांनी केला.