महाराष्ट्र

पवारांच्या घरावरील हल्ला प्रकणात 107 जणांना अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 April :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. पवारांच्या घरावरील हल्ल्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या घरी काही वेळापुर्वी पोलिस पोहचले त्यानंतर त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांची चौैकशी केली.

चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर सदावर्ते सातत्याने शाब्दिक वार करीत होते. या हल्ल्याचा कट त्यांनी आखला का याची चौकशीही केली जाणार आहे.

गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, यामागे सूत्रधार कोण आहेत याचा आम्ही शोध घेऊ. पवारांच्या घरावर आंदोलन करणारे सर्व आंदोलकच होते, त्यात एकही नेता नव्हता. आंदोलनात नेता नाही असे होऊ शकत नाही असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्या धर्तीवर गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी झाली असून त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.