महाराष्ट्र

पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 April :- एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अचानक हल्लाबोल केला. आंदोलक पळत आले व त्यांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाने शरद पवार यांच्या घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. तसेच काहींनी दगडफेक केली. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत प्रतिक्रिया दिली आहे.

”पवार यांच्या घरावरील हल्ला हा अजिबात समर्थनीय नाही. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे फडणवीसांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन टि्वट केले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे फडणवीस यांनी म्हटलं. तसेच दुसऱ्या टि्वटमध्ये त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले.

गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.