‘या’ तारखेला पार पडणार रणबीर-आलियाचा विवाहसोहळा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
6 April :- अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. वृत्तानुसार, 13 किंवा 14 एप्रिलपासून या कपलचा विवाहसोहळा सुरू होणार आहे. चेंबूरच्या ‘आरके हाऊस’मध्ये लग्नाआधीच्या विधी आणि भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. 3-4 दिवसांच्या सेरेमनीनंतर 17 एप्रिलला रणबीर-आलिया पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, आरके हाऊसमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या जोडप्याचा विवाहपूर्व सोहळाही पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडणार आहे. मात्र, या दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत दोघांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कुटुंबीयांना दोघांच्या लग्नाचा गाजावाजा करायचा नाहीये. 13 एप्रिल रोजी या आलियाच्या हातावर मेहंदी लावली जाणार आहे. यानंतर हळद, संगीतासह सर्व सोहळे होतील.
या भव्य लग्नासाठी कपूर घराण्याचा वारसा असलेल्या आरके बंगल्याची निवड करण्यात आली आहे. सूत्र सांगदतात, “कुटुंबाचा अर्थ द वर्ल्ड फॉर द कपल आहे. हे कदाचित या पिढीतील कपूर घराण्यातील शेवटचे लग्न असेल.” या भव्य बंगल्यात एक प्रशस्त लॉन आहे आणि येथेच हा विवाहसोहळा होईल. रणबीरचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्येच झाला होता.