‘या’ तारखेला जाहीर होणार 10 आणि 12 वीचा निकाल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 April :- कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी झालेल्या 10 आणि 12 वी परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल 10 जून आधीच जाहीर करण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने निकालाच्या तारखा आज जाहीर केल्या.
मंडळातर्फे सांगण्यात आले की, 12 वीचा निकाल दहा जूनपर्यंत जाहीर होईल, त्यानंतर 8 दिवसांनी 10 वीचा निकाल जाहीर होईल. दरम्यान 10 वी आणि 12 वीचे पेपर तपासण्यास शिक्षकांनी नकार दिला होता, त्यामुळेच हा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती पण आता परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार आहेत.
विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे. या शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे या मागण्यांसाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. परंतु शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये या सगळ्याचा निकालावर परिणाम होणार नाही अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
बारावीचे पेपर उशिरा सुरु झाल्याकारणाने बारावीचा निकालही 10 जूनपर्यंत आधी जाहीर करण्यात येईल आणि दहावीचा निकाल पेपर झाल्यावर 8 दिवसांनी लागेल असे बोर्डाने सांगितले आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. गेल्यावर्षीचा दहावी बारावीचा निकाल हा 99 टक्क्यांहून अधिक लागला होता.