राज ठाकरे झाले आजोबा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 April :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांचे पुत्र अमित ठाकरे व अमित यांची पत्नी मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे घर शिवतीर्थावर सध्या आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती आहे.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले होते. यादरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. या लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. आता अमित ठाकरे यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांना आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे सध्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल आहेत. आपल्याला नातू झाल्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाकडे रवाना झाल्याचे सचिन मोरे यांनी सांगितले आहे. सचिन मोरे यांनी फेसबुकवर ‘आमचे साहेब आजोबा झाले’ तसेच ‘युवराजांचं आगमन’ अशी पोस्ट करत राज ठाकरे व अमित ठाकरेंचे अभिनंदन केले आहे.