महाराष्ट्र

आणखी एका पुतण्याची काकांवर जोरदार टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- राज्यात शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष पाहायला मिळतो आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केल्याने शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका करताना मनसेला भाजपची सी टीम म्हणून काम मिळाले याचे बरे वाटले. आधी मी मनसेला टाईमपास टोळी म्हणत होतो. पण आता त्यांना भाजपचे काम मिळाले आहे, अशी जहरी टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मागे लागली आहे. केवळ निवडणुकीची निकाल पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची टूम काढली, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली होती. या वक्तव्याचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.