रमजानच्या महिन्यातही नवाब मलिक यांचा मुक्काम कोठडीतच
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 April :- नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएल कोर्टाने आजही मलिक यांना दिलासा दिला नाही, यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत रहावे लागणार आहे. नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दाऊदच्या गॅंगशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.
नवाब मालिक यांची कोठडी आज संपली होती. यामुळे त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले होते. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. यावेळी मालिकांना पलंग वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.