महाराष्ट्र

महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार, वेश्यांसाठी दिला जाणारा पैसाही खाल्ला!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- कोरोना काळात आर्थिक विंवचनेत सापडलेल्या वेश्यांना पाच हजारांची मदत करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली, पण वेश्यांना दिले जाणाऱ्या पैश्यांवरही सरकारही डल्ला मारला, हे सरकार डल्लेबाज आहे. ‘जाऊ तिथे खाऊ’ अशी महाविकास आघाडी सरकारची निती असून महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार आले, त्यांना शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. ते आज गडचिरोलीत बोलत होते. तेथे भाजपतर्फे आयोजित एल्गार मोर्चाला त्यांनी संबोधित केले.

फडणवीस म्हणाले, कोरोना काळात आर्थिक समस्या निर्माण झाल्या पण राज्य सरकारला बिल्डर गरीब झाल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी या बिल्डरांचा प्रमियम कमी केला, पण छोटे व्यापारी, गरीब कामगार, बारा बलुतेदारांतकडे सरकारने दुर्लक्ष केले. दरवर्षी बोनस देण्याचे काम आमच्या सरकारने केले. पण आता शेतकऱ्यांना बोनस नाही. सत्ताधाऱ्यांनी धान सेंटर खरेदी केले पण त्यातही भ्रष्टाचार केला. शिवसेनेच्या यशवंत जाधवांनी 24 महिन्यात 400 कोटींच्या 38 मालमत्ता घेतल्या.