राज ठाकरे-भाजप युतीवर दानवेंचे मोठे विधान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 April :- राज ठाकरे आणि भाजपची युती सध्या तरी शक्य नाही. जौपर्यंत ते परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत युती शक्यच नाही अशी स्पष्टोक्ती भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या प्रश्नावर तुर्तास पडदा पडला आहे.
नितीन गडकरी यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली आणि ही भेट वैयक्तिक होती हे त्यांनी स्पष्ट केले होते आता मीही राज ठाकरे यांची अधिवेशन झाल्यानंतर भेट घेणार आहे ही भेट राजकीय नसून वेगळ्या कामासाठी असणार आहे, असेही दानवे म्हणाले. हे सांगतानाच त्यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावाही केला. रावसाहेब दानवे कोणत्या कामासाठी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत व ते वेगळे काम कोणते असा प्रश्नही अशी उत्सुकताही आता जनतेला लागली आहे.
शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे. पण सी टीम म्हणून हिनवले जात असलेल्या मनेसचे भाजपकडून कौतूक होत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप युती होणार का असा प्रश्न समोर येत असतानाच याच प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले असून राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात जोपर्यंत बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.