महाराष्ट्र

अखेर पोदार शाळेची बस सापडली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असणाऱ्या पोदार शाळेची स्कूल बस बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बस सापडत नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर बस सापडली आहे. या शाळेच्या या बसमध्ये जवळपास 15 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. चालकाला रस्त्यांची माहिती नसल्याने बसला पोहण्यासाठी दोन तास उशीर झाला होता. दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. सदरील घटना मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील घडली.

दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.पोद्दार शाळेची स्कूल बस हीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती मात्र, सायंकाळी पाच वाजले तरी विद्यार्थी घरी पोहोचले नाही. त्यामुळे पालक घाबरून गेले होते.

विद्यार्थ्यांना घेऊन बस घरी आली नाही. तर नेमकी गेली कुठे, असा प्रश्न पालकांना पडला होता. चालकाचा फोन स्विच ऑफ असल्याने पालक चिंतेत सापडले होते. काही अनुचित घडले तर नसेल, अशी भीती त्यांना सतावत होती. पण, अखेर बसचा पत्ता लागला असून विद्यार्थी सुरक्षित असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले.