महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारवर राज ठाकरेंचा घणाघात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 April :- बिल्डरांच्या घशात मुंबई घातली, पण बाळासाहेबांचे स्मारक बांधायला महाविकास आघाडी सरकारला साधा प्लॉटही मिळत नाही. बाळासाहेबांचा फोटो दाखवून जनतेचे हजारो कोटी रुपये लुटले जात आहेत असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. बाळासाहेबांचे स्मारक बांधायचेच तर मोठे बांधायला हवे असेही ते म्हणाले.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळी राज यांनी सरकारवर प्रखर शब्दात हल्ला चढविला. महाराष्ट्रातील राजकारण, जातीपातीचे माजलेले स्तोम, सत्ताधारी व विरोधी पक्षातील संघर्ष, हिंदु-मुस्लिम विषय, तपास यंत्रणांच्या कारवाया यावर चौफेर फटकेबाजी राज ठाकरे यांनी केली.

ते म्हणाले, मुस्लीम समाजाने प्रार्थना करायची असेल तर ती घरी करावी. माझा प्रार्थनेला विरोध नाही पण मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. जिथे भोंगे लागतील तिथे आम्हाला लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावावा लागेल असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. मुख्यमंत्री पदाबाबत अडीच वर्षांचा पॅटर्न ठरला हे जनतेला त्यांनी कधीच सांगितले नाही. निकाल लागल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची टोम काढली अन् राष्ट्रवादी- काँग्रेससोबत बस्तान मांडले. मुख्यमंत्रीपदाची बाब चार भिंतीत का ठेवली महाराष्ट्राला सांगणे गरजेचे होते असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

राज ठाकरे सुरूवातीला म्हणाले, ”महाराष्ट्राच्या जनतेचे दर्शन घेताना अभिमान वाटतो. अख्खे जग कोरोनामुळे सामसुम होते, एक माणूसही रस्त्यावर दिसत नव्हता. कोरोनाची भीती अन् दुसरीकडे पोलिसांचा दांडा होता. संपुर्ण काळात पोलिसांचे काम वाखण्याजोगे होते. ते रात्र जागले, खाण्यापिण्याची पोलिसांनी पर्वा केली नाही. चोवीस तास ते रस्त्यावर होते.

दोन वर्षांनंतर बोलताना मोरी एवढी तुंबली की बोळा घालावा कुठुन कळतच नाही. शक्य होईल तेवढे साफ करू. जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला तशा अनेक गोष्टी जनतेच्या विस्मरणात गेल्या. ही सभा म्हणजे थोडासा मागोवा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपुर्वीच्या घटनाही आपण विसरलो. 2019 ला झालेली विधानसभेची निवडणूक विसरत आहात ते तुम्ही विसरता ते यांच्या फायद्याचे ठरते. विधानसभेची निवडणूक आठवा विरूद्ध कोण राष्ट्रवादी आणि काँग्रेस होते.

निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्षे ठरली हे आम्हाला उद्धव ठाकरेंनी कधी सांगितले नाही. पंतप्रधान म्हणाले होते की, आमचा मुख्यमंत्री बनेल, अमीत शाहही याच विषयी बोलले, तेव्हाही तुम्ही गप्प बसलात. निकाल लागल्यानंतर तुम्ही टोम काढली अन् राष्ट्रवादी- काँग्रेससोबत बस्तान मांडले. मुख्यमंत्री पदाची बाब चार भिंतीत का ठेवली महाराष्ट्राला सांगणे गरजेचे होते असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.