महाराष्ट्र

रेल्वेचा मोठा अपघात; 10 डबे रुळावरुन घसरले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 April :- नाशिकहून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या लहवीत व देवळाली दरम्यान पवन एक्सप्रेसचे तब्बल 10 डबे रुळावरुन घसरलेत. दुपारी 3 च्या सुमारास झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा बळी गेला. तर 5 जण जखमी झाले. पण, प्रत्यक्षदर्शींनी जखमींचा आकडा 10 हून जास्त असल्याचा दावा केला आहे. ही एक्सप्रेस रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून जयनगर (दरभंगा)कडे जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता 11061 LTT-पवन एक्सप्रेस सुटली. दुपारी तीनच्या दरम्यान ही एक्सप्रेस नाशिकजवळील देवलाली येथे आली असता Dn मार्गावर अचानक रुळावरून दहा डब्बे घसरले.पवन एक्सप्रेसला झालेल्या या अपघाताचे वृत्त कळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातामुळे या मार्वागावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पवन एक्सप्रेस सकाळी 11.30 वा. मुंबईहून निघाली होती.

रस्त्यात देवळालीलगतच्या एका डोंगरावर तिला अपघात झाला. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 1 जण ठार झाला आहे. तर 5 जण जखमी झालेत. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून जयनगरकडे (दरभंगा) जात होती.

सर्वाधिक नुकसान A1व B2 या दोन डब्यांचे झाले आहे. हा अपघात डोंगरावरील एका वळणावर झाला. या अपघातानंतर मध्य रेल्वेने 3 रेल्वे रद्द केल्यात. तर 3 रेल्वेंचे मार्ग बदललेत. दुर्घटनेत रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूक सुरूळीत होण्यासाठी वेळ लागू शकतो.