बीड

‘या’ वस्तू होणार स्वस्त; फ्रीज, हेडफोन, कार महागणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 April :- नवं आर्थिक वर्ष आजपासून सुरू झालं आहे. या नव्या वर्षात बॅंकिंग, तसंच काही आर्थिक बाबींच्या नियमांमध्ये बदल होत आहे. हे बदल 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधन, एलपीजी, खाद्य तेल आदींच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानं देशातले नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात 1 एप्रिलपासून रोजच्या वापरातल्या अन्य काही वस्तूदेखील महाग होत आहेत.

यामध्ये कार, रेफ्रिजरेटर, प्रीमियम हेडफोन्स, वायरलेस इयरबड्स या वस्तूंचा समावेश आहे. दुसरीकडे, 1 एप्रिलपासून स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि फिटनेस बॅंडच्या किमती कमी होणार आहेत. ग्राहकांना महागाईचा चटका नक्कीच सहन करावा लागणार आहे. आजपासून 1 एप्रिल रोजच्या वापरातल्या काही वस्तू महागणार आहेत, तर काही वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. या वस्तूंवरचे टॅक्सेस आणि कस्टम ड्युटी अर्थात सीमा शुल्कात बदल करण्यात आले आहेत.

या बदलाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चं बजेट सादर करताना केली होती. 1 एप्रिलपासून इयरबड्सच्या किमतीत वाढ होणार आहे. सरकारने इयरबड्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. अशा स्थितीत आजपासून इयरबड्सचा उत्पादन खर्च वाढू शकतो. उत्पादन खर्च वाढल्याने वायरलेस इयरबड्स, नेकबॅंडच्या किमतीतही वाढ होणार आहे. भारतीय बाजारपेठेत प्रीमियम हेडफोनच्या किमती तुलनेनं जास्त आहेत. त्यातच सरकारने या हेडफोनच्या आयात शुल्कावर 20 टक्क्यांहून अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंपोर्टेड प्रीमियम हेडफोनसाठी युझर्सना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.