महाराष्ट्र

महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे सावट

unjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 March :- महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये सध्या कोळसा टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील घरगुती वीज वापराच्या ई, एफ, जी, जी- १, जी- २ या पाच ग्रुपमधील फीडरवर मंगळवारी (दि.२९) अर्धा ते एका तासाचे आपत्कालीन भारनियमन झाले. कृषी फीडरला ८ ऐवजी केवळ ५ तासांचा वीजपुरवठा झाला. हे भारनियमन करताना महावितरणने नवीन आदेश काढला नाही. सहा वर्षांपूर्वीच्या जुन्या आदेशानुसार आपत्कालीन भारनियमन झाले. दरम्यान, तापमान वाढीसोबतच कोळसा टंचाई कायम राहिल्यास आगामी आठवड्यात राज्यात भारनियमन सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यभरात तापमानाने चाळिशी ओलांडल्याने विजेची मागणी वाढली. गेल्या वर्षी मार्च २०२१ मध्ये महावितरणची विजेची सर्वाधिक मागणी २० हजार ८०० मेगावॅट होती, त्यात यंदा तब्बल ३,५४० मेगावॅटची वाढ झाली. यानंतर एप्रिल व मे महिन्यात ऐतिहासिक मागणी नोंदवली जाऊ शकते. त्यात महावितरणची मागणी २५ हजारांवर, तर राज्याची मागणी २८ हजार मेगावॅटपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.