मुख्यमंत्र्यांवर हल्ला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
27 March :- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर एका तरुणाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, सुरक्षेतील गंभीर त्रुटीमुळे या तरुणाने सहज मागून येऊन मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. त्यानंतर उपस्थित पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
शंकर असे तरुणाचे नाव आहे. तो बख्तियारपूर येथील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या बरह लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री बख्तियारपूरमध्ये शीलभद्र यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत होते. त्यानंतर आरोपी शंकर गर्दीतून बाहेर आला आणि सुरक्षा रक्षकाच्या समोर स्टेजवर पोहोचला आणि सीएम नितीश कुमार यांच्यावर मागून हल्ला केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही क्षणभर नेमके काय झाले, हे समजले नाही. मात्र, लगेचच त्यांनी स्वत:ला सावरले. त्याच्या संरक्षणात तैनात असलेल्या पोलिसांनी तरुणाला पकडले व त्याला चोप द्यायला सुरूवात केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच पोलिसांना थांबवले. सध्या बख्तियारपूर पोलिस ठाण्यात तरुणाची चौकशी सुरू आहेत. तरुणाचे सोन्या-चांदीचे दुकान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. यामुळे तो अस्वस्थ असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.