महाराष्ट्र

वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 March :- ऊर्जा सचिव आणि तिन्ही वीज कंपनी प्रशासनासोबत वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने दीड लाखांवर वीज कामगार, कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.

सोमवारी (ता. 28) सकाळी 10 वाजेनंतर औरंगाबादेतील मिल कॉर्नर येथील प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे, निदर्शने, आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याचे एसईएचे सचिव अविनाश चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. संपामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण, महावितरणचा मनमानी कारभारामुळे तिन्ही वीज कंपन्यांतील वीज कामगार ते अधिकारी हैराण झाले आहेत. या विषयी वारंवार आवाज उठवूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे 41 संघटनांनी एकत्रित येऊन 28 व 29 मार्च रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला होता. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व शुक्रवारी प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे संजय खंदारे यांचासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.