बीड

मुलींनी स्व स्वसंरक्षणाचे धडे घेणे काळाची गरज- डॉ दिपा क्षीरसागर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड, दि. २७ :- आपण शरीराने कमजोर आहोत हा मनात असलेला भ्रम काढून टाकून मुलींनी स्व स्वसंरक्षणाचे धडे घेणे आता काळाची गरज बनली आहे. स्वतःला शारीरिक दृष्ट्या मजबूत बनवून आपल्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मुलींनी आणि स्त्रियांनी आता स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. लक्षात ठेवा मुली आणि स्त्रीया या सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम आहेत त्यांना संधी मिळाली की त्याचे त्या सोने करतात हा आजवरचा इतिहास आहे. असे वक्तव्य डॉ दिपा क्षीरसागर यांनी सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टस् असोसिएशन, बीड (महाराष्ट्र राज्य) व पोलिस स्टेशन, शिरुर (कासार) यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात केले.

रविवार, दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टस् असोसिएशन, बीड (महाराष्ट्र राज्य) व पोलिस स्टेशन, शिरुर (कासार) यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वसंरक्षण प्रशिक्षण समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षा म्हणून दीपा क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली होती तर व्यासपीठावर पोलिस निरीक्षक माने, एल एस शिंदे, गोकुळ पवार, मुख्याध्यापक जायभाये, धाबे मॅडम, कुलथे मॅडम, महिला पोलिस अधिकारी दोडके मॅडम, प्रशिक्षक डोंगरे, डॉ सानप, डॉ शिंदे मॅडम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील 80 मुलींना स्व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या प्रसंगी डॉ दिपा क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाल्या की, मेरिकोमने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्वतःला कसे सिध्द करून जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. समाजातील प्रत्येक मुलीने देखील मेरिकोम प्रमाणे सक्षम आणि निर्भीड होणे गरजेचे आहे. काळ बदलत आहे तस तसे मुली आणि स्त्रिया बाहेर आणि घरी सुरक्षित नाहीत असे सातत्याने वर्तमानपत्रातील बातम्या वाचून लक्षात येते. पण मुली आणि स्त्रीयांनी खचून न जाता स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनवणे गरजेचे आहे. मुलींना कोणता स्पर्श योग्य आणि कोणता स्पर्श अयोग्य याची जाणीव होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमा दारम्यान प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.