बीड

भीषण अपघात शिवसेना नेत्याचा मृत्यु

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 March :- अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील शिवसेना नेत्याचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) रात्री घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाली जवळील बळीराजा हॉटेल समोर ही घटना घडली. गणेश गोपाळराव मोरे (वय रा. लिंबागणेश ता.बीड) असे अपघातातील मयताचे नाव आहे.

गणेश मोरे हे लिंबागणेश येथील शिवसेनेचे जेष्ठ नेते होते. शुक्रवारी ते काही कामानिमित्त बीडकडे येत असताना बळीराजा हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला (एमएच-23 एस-0034) अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, जमादार आनंद मस्के, कांदे जी. व्ही, वाहनचालक खय्युम खान, तसेच महामार्ग पोलीस पोना. विलास ठोंबरे, म्हेत्रे, नरवणे, थोरात, जाधव यांनी धाव घेतली. मृतदेह शविविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.