महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी भाजपला खडसावले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 March :- हे शासन बेवड्यांचे शासन व महाराष्ट्र म्हणजे मद्यराष्ट्र असा मुनगंटीवार यांनी काल उल्लेख केला तो योग्य नाही. आमच्यावर टीका करा परंतू महाराष्ट्राला बदनाम करू नका. राज्यपाल जर आमच्या कामांचे कौतूक करीत असतील तर विरोधक का करीत नाही. त्यांना आरशात पाहिल्यावरही भ्रष्टाचार दिसतो असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.

विधीमंडळाच्या अंतीम आठवडा प्रस्ताव चर्चेवेळी ठाकरे यांनी सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. मंत्री महोदयांनी माझ्या शस्त्रक्रियेच्या काळात सांभाळून घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

ते म्हणाले, आपला तो बाब्या दुसऱ्यांचे कारटे असे भाजप वागत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मद्यराष्ट्र हा महाराष्ट्राचा उल्लेख केला तो योग्य नाही. महाराष्ट्रात सर्वात कमी दारूची दुकाने आहेत. सुपरशॉपी व मॉलमध्येच मद्य मिळते किराणा दुकानात मिळत नाही हे लक्षात ठेवावे. कर्नाटक, उत्तरप्रदेशात सर्वात जास्त दारूची दुकाने आहेत तेथे भाजपचे सरकार आहे. आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्राची बदनामी करु नका हे योग्य नाही याची दखल नागरीक घेतात हे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले.

रावणाचा जीव बेंबीत तसा काहींचा जीव बेंबीत नाही पण मुंबईत आहे. त्यांना केंद्रात सत्ता मिळाली तरीही मुंबईत त्यांचा जीव आहे. पण मुंबईकर असल्याचा मला अभिमान आहे. मुंबई मॉडेल जगात परिचित झाले. ठाकरे म्हणाले, अधिवेशनावर मी मनमोकळे, तळमळीने बोलणार आहेत. मला दुखः वाटते की राज्यपालाचे अभिभाषणाही त्यांना पूर्ण करता आले नाही.

राज्यपालांना राष्ट्रगीतांनाही थांबता आले नाही हा राज्यपालांचा अपमान आहे. देशात असा अपमान कुणाचा झाला नाही. मराठी भाषिकांचे हक्क, प्रश्न, छत्रपतींचा कर्नाटकात झालेला अपमान यावर राज्यपालांनी निषेध व्यक्त केला कोविड काळात ऑक्सिजन पुर्तता करणाऱ्या यंत्रणेचे राज्यपालांनी अभिनंदन केले. आरोग्यमंत्र्यांचेही कौतूक त्यांनी केले. पण विंदांच्या कवितेप्रमाणे फडणवीस वागत आहे. राज्यपाल कौतूक करतात पण विरोधक मात्र कौतूक करीत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.