उन्हापासून बचावासाठी रस्त्यावरील गोगल्स घेताय, सावधान!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 March :- सूर्य आग ओकत असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, टोपी, तसेच सन ग्लासेसचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. बाजारामध्ये आकर्षक असे सन ग्लासेस उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही वापरात असलेले सन ग्लासेस डोळ्यांसाठी सुरक्षित आहेत का? हे नक्की पहा कारण स्वस्तात उपलब्ध असणारे गोगल्स तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.
उन्हापासून बचाव करण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा सन ग्लासेसची दुकानं थाटण्यात आलीये. केवळ ९९ रुपयामध्ये आकर्षक सन ग्लास्सेस उपलब्ध होत असल्याने नागरीक देखील हि गोगल्स आवर्जून घेत आहेत. तुम्ही जर रस्त्यांच्या कढेला उपलब्ध असणारे आकर्षक गोगल्स वापरत असाल तर ते तुमच्या डोळ्यांसाठी इजा करणारे ठरू शकतात.
रस्त्याच्या कडेला केवळ ९९ रुपयात मिळणारे आकर्षक गोगल्स वापरल्यास डोळे लाल होणे, एलर्जी होणे, मोतीबिंदू तसेच काचोळा सारखे डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे डोळ्यांची सुरक्षितता म्हणून पोलोराईज ग्लास असणारे गोगल्स उन्हाळ्यात वापरण्याचं आव्हान नेत्र तज्ञांकडून केलं जातंय.