तो दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा असेल; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 March :- राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकारणाचा पाराही आता चढत आहे. जिल्ह्याच्या बदनामीवरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. त्यावर पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले असून ”ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, तो दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा असेल.” असे उत्तर त्यांनी धनंजय मुंडे यांना दिले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडच्या महिला आमदारांनी त्याच जिल्ह्यात सुरक्षित नाही असे वक्तव्य केले होते. जिल्ह्याच्या बदनामीवरून मुंडे बहीण – भावांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपांना पंकजा मुंडे यांनी एका सभेत उत्तर दिले आहे.
धारूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी माझा शेवटचा श्वास असेल. स्वर्गातही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची मान खाली होईल. अशा पद्धतीने मी कधीही वागणार नाही. मी कधी कुणाकडून पैसे खाल्ले नाही. कधी कुणाचा चहा पिले नाही. कधी कुणावर खोट्या कारवाया केल्या नाहीत. बदनामी करावी असे काही मी कधीच केले नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मी ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मार्फत अनेक निधी दिले. आणि त्यांच कामांचे आता लोकार्पण करून उद्घाटन करत आहेत. धनंजय मुंडे यांनी 3 वर्षांत एकतरी विकास काम आणले का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना विचारला आहे.धनंजय मुंडे यांचा चुकून झालेला विजयामुळे परळीकरांना वीट आला आहे. परळीत माझे फार्म हाऊस नाही, परळीत माझा महल नाही, असे म्हणणारा नेतास नकोय. आता परळीकरांना जनता जनता म्हणणारा नेता हवा आहे.
जिल्ह्यातील वाळू माफिया,गुटखा माफिया, वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. आता हे माफीया राज बंद व्हायला हवे अशी जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या बदनामीचा मुद्दा गाजणार आहे.