महाराष्ट्र

मोठी बातमी! रूपाली चाकणकरांनी दिला राजीनामा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 March :- राज्य महिला आयोगाच्या अक्षध्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्ष पद कोणाकडे दिलं जाणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. रूपाली चाकणकर यांनी अनेकवेळा राज्यातील महिलांचे प्रश्नांवरून आवाज उठवला आहे. कमी वेळातच रूपाली चाकणकर यांचा नगरसेविका ते राज्य महिला आयोग अध्यक्ष असा प्रवास झाला आहे. रूपाली चाकणकर त्यांच्या खास शैलीमध्ये विरोधकांना प्रत्युत्तर देतात. महिला आयोगाचं अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून रूपाली चाकणकर यांनी अनेक प्रकरणांवर तातडीने अॅक्शन घेतली आहे.

अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं होतं. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रूपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत होतं. लहान मुलीच्या विवाहावरून रूपाली चाकणकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी तातडीने सुचना दिल्या होत्या. तसेच त्यांनी गावाची देखील पाहणी केली होती. दरम्यान, महिला संघटन अधिक बळकट करण्याचं काम रूपाली चाकणकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबादारी कोणाकडे देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.