महाराष्ट्र

पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 March :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या आहेत. त्याची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहिती स्वत: ईडीने दिली आहे.

ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे शरद पवार म्हणाले.

श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुने कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. खरं सांगायचे म्हणजे गेल्या 5 – 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था कुणाही माहिती नव्हती, मात्र आता खेड्या-पाड्यात ईडी विषयाच्या चर्चा केल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवाने सुरू आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का. असे शरद पवार म्हणाले.