बीड

धनंजय मुंडेंचा शैक्षणिक संस्थांना इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 March :- फी न भरल्याने विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. याप्रकरणी आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आमदार सुनिल प्रभू यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, शैक्षणिक संस्थांना फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रोखता येत नाही. टाटा सामाजिक विज्ञान संस्था Tata Institute of Social Sciences (TISS) कडूनही आडकाठी घालण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

फी न भरल्याने फक्त शाळाच प्रमाणपत्र (मार्कशीट) देत नाहीत असे नाही तर टाटासारख्या नामांकित शिक्षण संस्थेनेही पदवी प्रमाणपत्र दिले नाहीत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजेच टीसने ही 153 विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाणपत्र दिले नाहीत.

अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना फी न भरल्याने प्रमाणपत्र देण्यास टीसने मनाई केली आहे. प्रमाणपत्रच नाही तर इतर कागदपत्रे ही देण्यास टीसने मनाई केली, अशी माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना सरकारने शिष्यवृत्ती देण्यास विलंब लावल्याने टीसने विद्यार्थ्यांची आडकाठी केली.

याबाबत समाज कल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी टीस संस्थेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी 78 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा झाली होती. परंतु त्यांनी शुल्काची रक्कम संस्थेकडे जमा केली नसल्याने त्यांचे पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती मिळाली होती. 4 मार्च रोजी सरकारने टीसला पत्राद्वारे ही प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. फी न भरल्याच्या कारणावरुन असे पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना रोखता येणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी लेखी उत्तर दिले.

धनंजय मुंडे यांनी लेखी उत्तरात असेही म्हटले आहे की, विविध महाविद्यालयात शिकत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची फी न मिळाल्याने अडवणूक होत आहे. तसे होत असेल तर महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचनाही मुंडे यांनी दिल्या आहेत.