मलिकांचा जेलमधील मुक्काम वाढला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 March :- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून भाजपने वातावरण पेटवले होते. त्यानंतर त्यांच्याकडील मंत्रीपदाचा कार्यभार जबाबदारी काढुन घेण्यात आली आहे.
नवाब मलिक यांना 4 एप्रिलपर्यंत जरी कोठडीत रहावे लागणार असले, तरी त्यांची बेड वापरण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यांच्या पाठदुखीच्या त्रासामुळे त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र मलिकांनी केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आहे. तर त्यांच्या बहीणीशी जमीन व्यवहार आदीबाबत नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची अटक चुकीची असल्याचा दावा खोटा आहे. असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते.
केंद्रीय तपासयंत्रणेची कारवाई कायद्याला अनुसरूनच आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यावेळी नवाब मलिक यांच्या समोर रितसर जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी सुरू राहणार आहे.
नवाब मलिक प्रकरणावर बोलताना कुणाचे तरी आयुष्य बेरंग करणाऱ्यांला देवही माफ करीत नाही, आत गेलेला माणूस कदाचित खंगून खंगून मरेलही पण हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली होती. यानंतर वाढलेली मलिकांची कोठडी म्हणजे त्यांचाही छगन भुजबळ होणार का असा सवाल राजकीय जानकारांना पडला आहे.