विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी यासाठीच युवक बिरादरीचे कार्य – डॉ.दीपा क्षीरसागर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
बीड दि. २१ (प्रतिनिधी)- शाळा महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यात बंधूभाव, देशप्रेम, निसर्गप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता यासारख्या नैतिक मुल्यांचा विकास होऊन त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन प्राबोधनात्मक विचाराची निर्मिती होऊन देशाच्या एकसंघतेसाठी विद्याथ्यार्ंचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी युवक बिरादरी भारतचे कार्य व योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन युवक बिरादरीच्या मराठवाडा समन्वयक प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केले.
सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड आणि युवक बिरादरी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक सूर एक ताल या नृत्य गायनाच्या मुख्य कार्यक्रमाचे सादरीकरण करून समारोप करण्यात आला.या प्रसंगी प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर बोलत होत्या. यावेळी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव,नगराध्यक्ष तथा युवक बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,मराठवाडा समन्वयक डॉ.दीपा क्षीरसागर,डॉ.महेश गोलेकर,डॉ.सारिका क्षीरसागर,प्रकल्प संचालक प्रशांत वाघाये, नगेंद्र रॉय आदींची उपस्थिती होती.
युवक बिरादरीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून सौ.के.एस.के.महाविद्यालयात एक सूर एक ताल या कार्यक्रमा अंतर्गत हिरवे आंगण,तंटामुक्ती, व्यसनमुक्ती,प्रदूषण मुक्त परिवार व उडान अभियान च्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी नृत्य गायनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.दिनांक 21 मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नृत्य गीत गायनाचे सादरीकरण करण्यात आले.अक्षय ऊर्जा, जल ही जीवन है,जातीभेद निर्मुलन,निसर्गाचे महत्व,सामाजिक समतेचा संदेश देणारी कव्वाली व हा नाश थांबवा वसुंधरेचा यासारखी प्रबोधनात्मक गीते हिंदी,मराठी,बंगाली,गुजराती,पंजाबी या भाषेत एकावेळी 600 विद्यार्थ्यांनी सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक प्रशांत वाघाये म्हणाले की, अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या एकात्मतेसाठी एक सूर एक ताल या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण देशभरात करण्यात येत आहेत.
मागील तीन दशकांपासून युवक बिरादरीच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्य केले जात आहेत.मराठवाडा समन्वयक प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर व युवक बिरादरीचे बीड जिल्हा संस्थापक अध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे योगदान महत्वपूर्ण राहिलेले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक बिरादरीच्या माध्यमातून भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा मानस वाघाये यांनी व्यकत केला.
प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर,डॉ.सारिका क्षीरसागर,डॉ.महेश गोलेकर यांच्या हस्ते एक सूर एक ताल या उपक्रमात सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गोैरविण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर संचालक डॉ.सतीष माऊलगे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक जालींदर कोळेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय पाटील देवळाणकर यांनी केले तर आभार डॉ.महेश गोलेकर यांनी मानले.