महाराष्ट्र

शिवसेना नेते यशवंत जाधव, आ यामिनी यशवंत यांचा 1 हजार कोटींचा घोटाळा उघड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 March :- शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुका आता किमान सहा महिने पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी शिवसेनेची कोंडी करण्यास भाजपने सुरुवात केल्याचे दिसत आहे.

मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव व त्यांची आमदार पत्नी यामिनी यशवंत यांचा तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा उघड झाल्याचे ट्विट भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केले आहे. तसेच, याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) व आयकर विभागाने चौकशीही सुरु केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या मुंबई पालिका निवडणुकीतही शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.


शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी 24 महिन्यात मुंबईत 1000 घर/दुकान/गाळे असलेल्या 36 इमारती विकत घेतल्या. जाधवांकडे इतकी संपत्ती आहे, तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल? असा सवाल किरिट सोमय्या यांनी विचारला आहे. तसेच, ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच यांच्यावर कारवाईची अपेक्षा आहे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.