होळीसंदर्भात नवी नियमावली जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 March :- यंदा होळी धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे. गृहविभागाने होळीसंदर्भात जारी केलेले नियम मागे घेतले आहेत. होळीसाठी गृहविभागाने नवी नियमावली जारी केली आहे. गर्दी न करता होळी साजरी करण्याचे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून निर्बंध हटवल्याने आता होळी, धुळवड मनसोक्तपणे साजरी करता येणार आहे.
कोरोनामुळे राज्यात गेली दोन वर्षे होळी आणि धुलीवंदन हा सण साजरा करता आला नव्हता. यातच यंदाही निर्बंध लावल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही 17, 18 आणि 22 मार्च रोजी साजरे होणारे हे सण मोठ्या प्रमाणावर गर्दी न करता आरोग्याची काळजी घेऊन साजरे करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.
राज्याच्या गृहविभागाने यापुर्वी जारी केलेल्या नियमावलीनुसार, रात्री 10 वाजेच्या आत होळी पेटवणे बंधनकारक असून, होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. तसेच . होळी आणि धुलीवंदन साजरे करत असताना मद्दपान करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार होती. तसेचच धुलीवंदन साजरे करताना डीजे लावण्यास बंदी घातली होती. याशिवाय, धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, किंवा फुगे मारू नये आणि कुठल्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, अशा घोषणा देऊ नये, असेही निर्बंध लावले होते. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असले तरी अजूनही काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढता आहे. त्यामुळे प्रत्येक होळी आणि धूलिवंदन साजरी करताना काळजी घ्यावी.