महाराष्ट्र

होळी, धुलीवंदनासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 March :- करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी करोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

राज्याच्या गृहविभागाने होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे . या नियमावलीनुसार रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आलंय. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे
होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.
दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.
होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.
कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.
दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.