बीड

बीड- बशीरगंज भागात राहणारी २ तरुण ठार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 March :- मित्राला सोडून परळीहून बीडकडे मोटारसायकलवर येणाऱ्या तरुणास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात दोन्ही तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घाटसावळीजवळ घडली. दोन्ही मयत तरुण बीड शहरातील बशीरगंज भागातील होते. या घटनेने बशीरगंज भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड शहरामधील बशीरगंज भागात राहणारे शेख शाहीद सलीम बागवान व हाफिज माहरुफ शफीक फारुकी हे दोघे काल आपल्या मित्राला सोडण्यासाठी परळीला गेले होते. त्यास त्याठिकाणी सोडून हे दोघे परळीहून बीडकडे आपली मोटारसायकल (क्र. एम. एच. २३ बी. डी. २५००) यावर येत होते.

घाटसावळीजवळ रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात शेख शाहीद सलीम बागवान (वय १९) व हाफिज माहरुफ शफीक फारुकी हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. या घटनेने बशीरगंज भागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.