महाराष्ट्र

सरकार आणण्यासाठी भाजप महाविकास आघाडीच्याआत काड्या लावतेय – उपमुख्यमंत्री अजित पवार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 March :- महाराष्ट्रात भाजपचे सरकार यावे यासाठी भाजप मविआत काड्या लावत आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. अर्थसंकल्पावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला मिळतो असा, आरोप अजित पवारांवर केला होते. या आरोपांना आज अजित पवारांनी उत्तर देत भाजपवर टीका केली आहे.

सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात. परंतू या पक्षाला इतका निधी त्या पक्षाला इतका निधी, असले काहीतरी सांगून तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. अशी टीका अजित पवारांनी केली आहे. यासाठी काड्या लावायचेही काम विरोधी पक्षाकडून सुरु आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांचे काही सदस्य अर्थसंकल्पाच्या खोलात न जाता नुसता पेपर वाचून अरे हे काय चाललंय? अशी प्रतिक्रिया देतात. म्हणजे शिवसेनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना वाटेल की, अरे उद्धव ठाकरेंना काही कळते की नाही, दिसत आहे की नाही? किंवा काँग्रेसचे नेते काय करतात? असेही त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू शकते असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे.

सरकार चालवायचे असले की कोणताही भेदभाव करून चालत नाही. जेव्हा अर्थसंकल्प तयार करतो, तेव्हा त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असते, आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देत असते. सरकार टिकवायचे असेल तर असे करून सरकारी चार दिवसही चालणार नाही. त्यामुळे सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी वागणूक इतर पक्षांना देत नाही असेही पवारांनी स्पष्ट केले. तर असा प्रयत्न इतर पक्षांनीही करु नये, अशा शब्दांत पवारांनी भाजपच्या सदस्यांना टोलाही लगावला आहे.