महाराष्ट्र

बसेसमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 March :- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलबाहेर गोंधळ घालत तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या आयपीएल खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांनी काठ्या, दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

आयपीएलसाठी महाराष्ट्राबाहेरून कंत्राटी पद्धतीने बस आणल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष करून बाहेरील राज्यातील लोकांना लाभ मिळत आहे. यावेळी आयपीएलचे सर्व लीग सामने महाराष्ट्रात होणार आहेत. यातील सर्वाधिक सामने मुंबई आणि पुण्यात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तोडफोड करणारे कामगार मनसेच्या वाहतूक शाखेशी संबंधित आहेत. मध्यरात्री ही तोडफोड झाली. त्यांनी आधी बसमध्ये प्रवेश केला आणि नंतर लाठ्या-काठ्या घेऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मागण्यांचे पोस्टर लावत घोषणाबाजी करत बसच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी उर्वरित बसेस तोडफोडीपासून वाचवल्या.

‘मनसे’चे संजय नाईक यांनी सांगितले की, ‘आमच्या विरोधानंतरही दिल्ली आणि इतर ठिकाणांहून बस आणि छोटी वाहने येथे आणण्यात आली आहेत. ज्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. आमचा विरोध आहे, पण आमचे ऐकले जात नाही. यानंतर कामगारांनी हिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. मोसमातील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचे सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.