चीनमध्ये 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 March :- चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. चीनने गेल्या वर्षी झिरो कोरोना योजना आणखी होती असे असतानाही चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार वेगाने सुरू झाला आहे.
गेल्या 24 तासात चीनमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीन सरकारने 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या शहरातील सुमारे 3 कोटी जनता घरात बंद आहे.
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनूसार, गेल्या 24 तासात 5280 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. याच्या एक दिवस अगोदर 3000 रुग्णांनी नोंद करण्यात आली होती. चीनच्या सुमारे 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, त्यात 1.70 कोटी लोकसंख्या असलेला शेंजेन या शहराचा देखील समावेश आहे.
चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यापार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोग तज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ झेंग वेनहोंग यांनी इशारा दिला आहे की, चीनसाठी ही खूप कठीण वेळ आहे. ग्लोबल टाइम्सनुसार, वेनहोंगने यांनी सांगितले की, ही वेळ झिरो कोरोना पॉलिसीवर वाद घालण्याची नाही. कोरोनाला कशाप्रकारे आळा घालता येईल याविषयी रणनिती आखणे आवश्यक आहे. असे वेनहोंग यांनी सरकारला सांगितले आहे.
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने, त्याचा परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे. चीनच्या हाँगकाँग शेअर मार्केटमध्ये आज सकाळी 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे, मंगळवारी सकाळी बीजिंग आणि शांघायमधील विमानतळांवर डझनभर देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली. शांघायसह अनेक शहरांमधील इमारती देखील पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत.