News

पृथ्वीच्या दिशेने येत आहे नवं संकट

वॉश्गिंटन – एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अंतराळ संस्था नासाने एका अशा उल्कापिंडाचा शोध घेतला आहे. जो पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. याबाबत नासाने अलर्ट जारी केला आहे. जवळपास अर्धा किमी उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
त्याचा वेग ५.२ किमी प्रति सेंकद इतका आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हा उल्कापिंड ६ जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे, अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग इतका मोठा हा उल्का आहे. नासाने या उल्काला रॉक १६३३४८(२००२ NH४) असं नाव दिलं आहे. ६ जून रोजी हा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. याची लांबी २५० ते ५७० मीटर इतकी आहे तर १३५ मीचर रुंद आहे. हा उल्का सूर्याच्या नजीकहून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल.
मागील २१ मे रोजी १.५ किमी आकाराचा उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून पुढे गेला. वैज्ञानिकांचे म्हणणं आहे की, हा उल्कापिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता कमी आहे. पण कधीकधी गुरुत्वाकर्षणामुळे शेवटच्या क्षणीही हा उल्कापिंड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करु शकतो त्यावर नजर ठेवावी लागणार आहे. नासाच्या माहितीनुसार रॉक १६३३४८(२००२ NH४) उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून रविवारी सकाळी ८.२० मिनिटांनी जाईल. पृथ्वीच्या जवळून यानंतर कोणताही उल्कापिंड यानंतर २०२४ मध्येच जाईल. सध्या याचा वेग ५.२ किमी प्रति सेकंद इतका आहे म्हणजे ११ हजार २०० किमी प्रति तास वेगाने येत आहे.