गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत मोठी घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
14 March :- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. 2019मधील पोलीस दलातील 5 हजार 297 रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त उमेदवारांची नेमणूक देणं बाकी आहे. तसेच काही प्रमाणात उमेदवारांच्या मुलाखती घेणंही बाकी आहेत, असं सांगतानाच येत्या काळात पोलीस दलात आणखी 7231 पदांची भरती करण्यात येईल. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
या भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेऊ. त्यानंतर पुढील दोन वर्षातील भरती करायची त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे नेऊ. त्याला मंजुरी दिली तर आणखी पोलीस भरती होईल, असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भ्रष्टाचारांना संरक्षण दिल्यामुळे कोट्यवधी लोकांचा उडालेला विश्वास, गुडांकडून मिळालेल्या धमक्या, एसटी आणि आरक्षणा याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडला गेला. या प्रस्तावाचा विषय खूप मोठा आहे. परंतु दुर्देवाने चर्चेत भाग घेताना राज्याच्या समस्यांना हात घालून मला काही मार्गदर्शन मिळेल असं वाटलं होतं. पण विरोधी पक्षनेत्यांनी अधिकाधिक वेळ दोन प्रकरणांसाठी खर्च केला. तुमच्याच प्रश्नावर उत्तर दिलं. कायदे सुव्यवस्थेची आकडेवारी नाही दिली तर मीही तसंच उत्तर दिलं असं होईल, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.