महाराष्ट्र

वाचा,10 वीच्या परीक्षेसाठी बोर्डानं जारी केलेले नियम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 March :- महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एजुकेशनतर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा राज्यात मंगळवारपासून म्हणजेच 15 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदा दोन वर्षांनंतर बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत.

या नियमांचं काटकोरपणे विद्यार्थ्यांना पालन करावं लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया बोर्डाकडून जारी करण्यात आलेले नियम इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होतील आणि कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून त्या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील.

या नियमांचं पालन करणं आवश्यक
अर्जदारांनी त्यांच्या प्रवेशपत्रात कोणतीही चूक नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. प्रवेशपत्राशिवाय कोणालाही परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अनिवार्य COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रवेशपत्रासोबत स्वतःचा फेस मास्क, हँड सॅनिटायझर बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.


उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची झडती घेतली जाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला परवानगी दिली जाणार नाही.

परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे.
प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरुन खात्री करुन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे